# 1638: त्यांच्या मनात मी जिवंत असेन..! ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Manage episode 457903985 series 3431535
खूप दिवसातून मी त्यांना भेटत होतो....
मला बघितल्यावर मग, हात वारे करून माझ्याशी त्या हक्काने कचकचून भांडायला लागल्या...!
"आमी काय मरायचं का ? तू काय सोताच्या मनाचा मालक हाय का ? तुला काय लाज हाय का ?" वगैरे वगैरे...
शंभर गोष्टी त्यांनी मला सुनावल्या... !
"माझा डावा हात अजूनही नीट उचलत नाही.... तरीही मी मोटरसायकल चालवत गेलो होतो.... !
उजवा हात माझ्या डाव्या छातीवर ठेवून, अभिवादन करून, मी त्यांना समजेल अशा भाषेत सांगितलं, 'माज्या मानंच्या मणक्यामदल्या शिरा चीमटल्या हायेत...
माजा डावा हात नीट काम करत न्हायी... तरीबी तुमच्यासाठी गाडी चालवून हितपर्यंत आलो... फकस्त तुमच्यासाटी... !
आणि तुमि माज्याशी भांडायला लागला..." मी काकुळतीने बोललो... !
ही वस्तुस्थिती ऐकल्यानंतर त्यांचा चेहरा मात्र लगेच बदलला...
1660 odcinków